इधंन दरवाढीचा फटका आता एस टी प्रवाशांना ; तब्बल १८ टक्के भाव वाढीचा प्रस्ताव

टीम महाराष्ट्र देशा : इंधनदरातील सततच्या वाढीने खासगी वाहनचालक, रिक्षा-टॅक्सीप्रमाणेच एसटी महांमडळही मेटाकुटीस आली आहे. दरवाढीने प्रवासी दुरावतील ही शक्यता असूनही वाढीव इंधन खर्चावर मार्ग काढण्यासाठी महामंडळाने १८ टक्क्यांपर्यंतच्या भाडेवाढीचा प्रस्ताव आखला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही वाढ किमान १० टक्क्यांपर्यंत राहील, असा कयासही मांडला जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच महामंडळाने १८ टक्क्यांची भाडेवाढ लागू केली होती.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बस आहेत. काही वर्षांपर्यंत सबसिडीने डिझेल मिळत असल्याने महामंडळाचा तोटा कमी प्रमाणात होता. पण सबसिडी संपुष्टात आल्यावर तोटा वाढल्यावर तिकीट दरातही वाढ करावी लागली. त्यातून प्रवाशांनीही एसटी सेवांकडे पाठ फिरवल्याचे चित्र वारंवार दिसले. आता नव्याने भाडेवाढ केल्यास पुन्हा प्रवासी नाराज होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ऑक्टोबरमध्ये डिझेलचा दर ७१ रु. ८७ पैशांवर गेला असून एप्रिलमध्ये डिझेलसाठी प्रति लीटर ६३ रु. ७६ पैसे इतका दर मोजावा लागत होता. या वाढीव दराने महामंडळाच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडेवाढीचा उपाय शोधला जात आहे. महामंडळास दररोज सरासरी १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेलची आवश्यकता आहे. त्यानुसार एसटीस दर वर्षास डिझेलसाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये मोजावे लागतात.

You might also like
Comments
Loading...