मुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत

टीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मुरुड नगर परिषद संघर्ष कृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरुड ग्रामपंचायतीची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या पुढे असून कृषी व्येतिरिक्त व्यवसाय तीस टक्केच्यावर आहे तसेच मुरुडच्या वीस किलोमीटर अंतरावर दुसरी नगर पंचायत, नगर परिषद नाही हे तिनही निकष मुरुड ग्रामपंचायतीने 2011 साली पार केले आहेत.

औरंगाबाद उच्च न्यायालयात मुरुड नगर परिषद संदर्भात याचिका दाखल केली असता न्यायालयाने मुरुडला नगर परिषद करण्यासंदर्भात शासन आणि प्रशासनास निर्देश दिले होते शासनाच्यावतीने न्यायालयात शपथ पत्र ही दाखल केले होते.

न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, यांनी मुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव नगर विकास विभाग सचिव याकडे सुपूर्द केला होता.

नगर विकास विभाग, ग्रामिण विकास विभाग, विधी व न्याय विभाग आदींनी मुरुड नगर परिषदेच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून पुढील मजुरीस मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपूर्वी पाठवलेला होता अद्यापही मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा दिलेला नाही लवकरात लवकर मुरुड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करावे हि विनंती करण्यात आली आहे.

Loading...

दिलेल्या निवेदनावर मुरुड नगर परिषद संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयदीप सुरवसे, उपाध्यक्ष राजेंद्र देवकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन सांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.