मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी भाजपचे खा. मा. विकास महात्मे यांचा प्रचार दौरा

सांगली,२९ जुलै : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकांचा प्रचार संपण्यास अवघे चोवीस तास राहिले असून मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी भाजपचे खासदार मा. विकास महात्मे यांच्या सांगली दौऱ्याचे आयोजन भाजपतर्फे करण्यात आले आहे .

सांगली महापालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर लढणाऱ्या भाजपच्या प्रचारासाठी केंद्र आणि राज्यातील बड्या नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी त्यांचे शहरात आगमन होणार असून सकाळी दहा वाजता सांगली येथील कापसे प्लॉट या ठिकाणी ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत सांगलीतील वालसेनवाडी आणि नागराज कॉलनी या परिसरात त्यांची बैठक असून त्यांच्या पदयात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी एक वाजता विश्रामबाग येथील आमदार कार्यालयात त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी चार वाजता सांगलीच्या साईनगर परिसरात कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते सहभागी होतील. दिवस अखेरीस सायंकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत त्यांच्या तीन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिली सभा सांगलीच्या पंचशील नगरात, दुसरी सभा संजय नगर परिसरातील अभिनंदन कॉलनी येथे आणि तिसरी सभा कुपवाड शहरातील विजयनगर परिसरातील चाणक्य चौकात होणार आहे.

भाजपा प्रचाराची धुरा महिलांच्या हाती