मुंबई : महाराष्ट्रातील (महाराष्ट्र) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी (इतर मागासवर्ग) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण झाल्याचे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 2 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, जिथे निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. दरम्यान, आता राज्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला! सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार!”
ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला!
मा. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. #OBCReservation— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2022
अजित पवारांची प्रतिक्रिया!
अजित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार तसंच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली.”
“शरद पवार यांनी त्या काळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूनं ठाम भूमिका घेतली व राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा आनंद आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम आधीपासून आम्ही केलं. हीच भूमिका यापुढेही कायम राहील. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना यापुढेही सुरु राहतील, याची काळजी विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित घेऊ. ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसेच संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळालं आहे,” असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Balasaheb Thorat : मीच ‘मुख्यमंत्री’ आहे, हे एकनाथ शिंदेना सिद्ध कराव लागेल – बाळसाहेब थोरात
- Rohit Pawar on OBC Reservation | हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा विजय – रोहित पवार
- Obc Reservation : OBC आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- OBC Reservation | “महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश आले” ; OBC आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर अमोल मिटकरींचे ट्वीट
- OBC Reservation : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भुजबळ, मुंडे आणि वडेट्टीवारांनी ओबीसी आरक्षणाची लढाई यशस्वी करुन दाखवली – अजित पवार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<