जिद्द, चिकाटी, आणि दैवी शक्तीची अनुभूती देणारी व्ही.एन.एस.ग्रुप फलटणची शिवजल सृष्टी

V.N.S. Group

टीम महाराष्ट्र देशा : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या पलीकडेही एक जग असते. आणि त्या जगाचा अनुभव घेतल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही. अगदी अलीकडेच कामानिमित्त फलटणला जाण्याचा योग आला. खरं तर फलटणला जायला नेहमीच आवडते. शहरी वातावरणातून जरा गावाकडे आल्याचा मस्त फील येतो. फलटण तर तसे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर. पुण्यापासून अवघ्या १०० किलोमीटर वर असणारे फलटण, खरं तर भारतातील एक खूप पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून फलटण ओळखले जाई एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई ह्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या.

V.N.S. Group 1अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फलटण मध्येच व्यवसायातही माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या चौघा युवकांनी एकत्र येऊन व्ही एन एस ग्रुपची स्थापना केली. सचिन भोसले , संतोष वायचळ , नितीन जाधव आणि शीतल उर्फ अप्पा लोखंडे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतुन शून्यातून विश्व निर्माण करण्याचा ध्यास घेतला. या चौघांनी मिळून बांधकाम क्षेत्रातील कोणताही अनुभव पाठीशी नसताना २००५ साली व्ही. एन. एस. ग्रुपची स्थापना केली. आणि बघता बघता आज  तागायत १८ प्रोजेक्ट पूर्णत्वास नेले. ६ प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि ८ प्रोजेक्ट ची भूमिपूजन संपन्न झाली आहेत. या सर्व प्रोजेक्ट मध्ये फलटण च्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नाईकबोमवाडी येथील शिवजल सृष्टी हा प्रोजेक्ट व्ही. एन. एस. ग्रुपच्या वाटचालीतील एक माईल स्टोन ठरतोय.

जिद्द, चिकाटी, आणि दैवी शक्तीचा आशीर्वाद म्हणजे काय आणि त्यातून कसे एक न भूतो न भविष्यती कार्य घडून येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा प्रोजेक्ट – व्ही. एन. एस. – शिवजल सृष्टी. एक ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती असा शिवजलसृष्टी नावाचा एक टुमदार प्रोजेक्ट व्ही. एन. एस. ग्रुपच्या माध्यमातून तयार झालाय. न भूतो न भविष्यती असा प्रोजेक्ट म्हणण्यामागे याला अनेक करणे आहेत. कारण हा महाराष्ट्रातीलच नाहीं तर संपूर्ण भारतातील एक भव्य असा अफोर्डबल रेसिडेन्शल प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी केवळ रु २,६१,०००/- ते ५,५५,०००/- रुपयात १ आर के बंगलो तो सुद्धा आर. सी. सी. बांधकामासहित आणि सगळ्या सुख-सोयींनी युक्त असा हा प्रोजेक्ट आहे. येथील पॉजिटीव्ह वातावरण अनुभवून आल्याशिवाय कळणार नाही.

V.N.S. Group 2

याच परिसरात एक जागृत देवस्थान म्हणजेच भगवान शंकराचे मंदिर वसले आहे. किंबहुना ह्या जागृत अशा भगवान शिवाच्या स्थानामुळेच हा देखणा प्रोजेक्ट तयार झालाय. हा प्रोजेक्ट जेव्हा तयार होत होता तेव्हा व्ही. एन. एस. ग्रुपला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. मध्यंतरी आपल्या देशात नोटबंदी, रेरा, जी. एस. टी. आणि जागतिक मंदी मुळे बांधकाम क्षेत्रावर एक अभूतपूर्व नैराश्य आलं होत पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून व्ही. एन. एस. च्या टीम ने जणू शिवजल सृष्टी उभी करण्याचा ध्यासच घेतला होता. पण असे म्हणतात कि या ठिकाणी असलेल्या भगवान शिवाच्या वास्तव्यामुळेच हि शिवजल सृष्टी उभी राहिली. वातावरणातला पॉजिटीव्ह फरक हा तिथे गेल्याशिवाय अनुभवता येणंच शक्य नाही.

सुंदर मंदिर आणि मन मोहवून टाकणारे शिवलिंग मनाला प्रसन्न करून जाते. आणि त्यातच एक अद्भुत असा निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. या शिवलिंगाच्या डोक्याकडील भागातून पाण्याचा शीतल असा एक प्रवाह अनुभवायला मिळतो जणू काही शंकराने आपला तिसरा डोळा उघडून तो पाण्याच्या रूपातून आपल्या भक्तांना प्रसाद आणि आशीर्वादच देतोय. ह्या पाण्याचे वैशिष्टयही असेच आहे. हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे. यासंबंधीच्या जेवढ्या म्हणून टेस्ट आहेत त्या सर्व टेस्ट करून झाल्या आहेत. या सर्व टेस्टच्या माध्यमातून हे सिद्ध झाले कि हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे. ह्याचे रिपोर्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. जे पाणी आजच्या घडीला ६०० ते ७०० रुपये लिटर अशा भावात अनेक मान्यवर विकत घेतात आणि तेही परदेशातून आणले जाते तेच पाणी ह्या शिवजल सृष्टी मध्ये आपण प्रसाद रूपाने पिऊ शकतो. या पाण्याचे वैशिष्टही असे कि उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कि दुष्काळ असो पाण्याचा अखंड स्रोत रोज किमान ६०० लिटर पाणी हे रोज मिळतेच. चमत्कार असा कि इथून थोडे दूर गेलो आणि पाण्याच्या स्रोतांसाठी काही प्रयत्न केले तर 400 ते 500 फूट खाली खोल जाऊन देखील पाणी लागत नाही. पण इथून मात्र रोज अव्याहतपणे पाण्याचा निखळ स्रोत वाहतोय. शारीरिक दृष्टया ह्या पाण्याचे असामान्य महत्व आहे. अनेक आजारांवर ह्या पाण्याचा खूप चांगला पॉजिटीव्ह परिणाम दिसून आलाय आणि हे अनेक डॉक्टरांनी सिद्धही करून दाखवले आहे. म्हणूनच देशातील काही वॉटर प्युरिफायर उपकरण बनवणाऱ्या कंपन्यांनी आता अल्कलाईन वॉटर मिळण्याकरता आपल्या उत्पादनांमध्ये काही बदल घडवून आणले आहेत. पण तरीही आपण म्हणतो ना नॅचरल ते नॅचरलच.

या विषयातील एक जगप्रसिद्ध संशोधक स्पष्ट करतात कि अल्कलाईन वॉटर, जे कॅल्शियम, सिलिका, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि बायकार्बोनेट सारख्या अल्कलीजिंग घटकांमधील समृध्द आहे, कि 8 किंवा 9 च्या आसपास एक पीएच असल्यास, अक्ललाईन पाणी हे कमी अम्लीय आणि नियमित पाण्यातून अधिक मूलभूत असते. बाटलीबंदात आपण अल्कधर्मी पाणी शोधू शकता, किंवा आपण पाणी ionizer वापरून स्वतःच ते करू शकता (जरी ते स्वस्त झाले नाही तरीही – अमेझॅनवर एक $ 1,500 पेक्षा अधिक खर्च!). म्हणूनच मगाशी जे म्हणालो ना कि नॅचरल ते नॅचरलच. अल्कलाईन पाण्याचे फायदे तरी असे काय आहेत?संशोधक पुढे म्हणतात कि अल्कलीने वाढलेले पाणी पिण्यामुळे आपण खूप पीएच असल्याचे आणि त्यामुळे खूप अम्लीय असल्याचे आपण आपल्या शरीरातील अम्लता स्तरांवर एक समतोल राखू शकतो.

V.S.N. group 3

परिणामी, समर्थकांचा असा दावा आहे की आपल्याला या पाण्यामुळे मिळणारे आरोग्य आणि त्याचे हायड्रेशन बेनिफिट्स आवडतील, कारण त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे देखील समाविष्ट आहेत. एक लहान अभ्यासानुसार असे आढळून आले की खनिज आधारित अल्कधर्मीयुक्त पाणी अल्प कालावधीत नियमित पाणी पिण्याऐवजी निरोगी प्रौढांमध्ये हायड्रेशनच्या स्थितीत सुधारणा करू शकते. काही तज्ज्ञांच्या मते १०० जणांच्या गटावर एक प्रयोग करताना २०१६ साली असे आढळून आले कि, अक्ललाईन पाणी शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत करते आणि आपल्या शरीरात ऑक्सिजन पुरवण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया लवकर केली जाऊ शकते. सामान्य पाणी पेक्षा अधिक अल्कधनी असल्याने, तो आपल्या शरीरातील जादा आंबटपणा प्रतिबिंबित करू शकता. अल्कधर्मी पाणी मधुमेह आणि कर्करोगाच्या उपचारात तसेच हाडांचे आरोग्य वाढवण्यासाठी मदत करू शकते. अल्कधर्मी पाण्यात अंघोळ केल्याने त्वचेवर फायदेशीर परिणाम होण्याची शक्यता आहे.काही अभ्यासांत असे आढळून आले की अक्ललाईन पाणी हाडांचे संरक्षण करु शकतात.शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे पाणी खूप फायदेशीर आहे आणि महत्वाचे म्हणजे हे पूर्णपणे नॅचरल आहे.या पाण्यापासून होणारे फायदे आणि या ठिकाणी नव्याने सुरु होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांबाबत आपण पुढील लेखात जाणून घेऊयात. (क्रमशः)

भोसरीतील ‘डब्ल्यू.टी.ई.’ कंपनीची ‘पर्यावरण वारी’

शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवत गीता वाचली आहे का? : जयंत पाटीलLoading…
Loading...