म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत धोरण तयार करणार – राज्यमंत्री रविंद्र वायकर

अभिजित कटके

मुंबई: म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. याबाबत राज्य शासन अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत धोरण तयार करेल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य सदा सरवणकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.वायकर म्हणाले, दादर पश्चिमेतील छाप्रा व मोहसिन इमारतींच्या पुनर्विकासाचे काम विकासकाने अर्धवट अवस्थेत सोडले आहे. त्याबरोबरच विकासकाने भाडेकरुंना भाडे देणे देखील  बंद केले आहे. या संदर्भात संबंधित विकासकावर कारवाई केली जाईल. जे विकासक भाडेकरुंना भाडे देत नाही त्यांच्यासाठी ट्रांझिट कँम्पमध्ये राहण्यास परवानगी देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे श्री.वायकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, योगेश सागर, जितेंद्र आव्हाड यांनी भाग घेतला.Loading…
Loading...