समृद्धी महामार्ग बाधीत आंदोलक शेतक-यांना दलाल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध

chief-minister-devendra-fadnavis-pti.jpg.image.975.568

नाशिक: समृद्धी महामार्ग बाधीत जे शेतकरी आंदोलन करत होते ते आता दलाल बनले आहेत, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या विरोधात मुख्यमंत्री जेव्हा १० जिल्ह्यात येतील तिथे जावून काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने घेतला आहे.

आंदोलक शेतक-यांना भेटी व चर्चासाठी गेल्या १६ महिन्यापासून मुख्यमंत्री वेळ देत नाहीत तसेच शरद पवार यांनी प्रयत्न करून लावलेली बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केली होती. नाशिक जिल्हयात शिवडे येथील शेतक–यांनी रक्ताचे पत्र लिहून भेटीसाठी प्रयत्न केला तरी चर्चासाठी व समृद्धी महामर्गातील विरोध करत असलेल्या गावांना मुख्यमंत्र्यांनी भेटी द्याव्यात. बागायती जमिनी पहाव्यात ही माफक अपेक्षा ही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. उलट आंदोलक शेतकरी आता दलाल बनले असल्याचे विधान करून शेतक-यांचा अपमान केला असल्याची भावना वाढीस लागत आहे.

राज्याच्या प्रमुखानी शेतकरी आंदोलन संदर्भात दलाल म्हणून उल्लेख केला आहे. या दलालांना दलाली महाराष्ट्र शासनामार्फत अधिकारी देत आहे.दलाली करणा-या व जनतेच्या पैशाची दलाल देणा-याची न्यायालयीन चोकशी करावी. अशी मागणी समृद्धी बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे . मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय सांगत आहेत. शेतक-यावर जमिनीसाठी बळजबरी करीत नाही.मात्र १ वर्षांत ठाणे, नाशिक,औरंगाबाद,जालना,अमरावती येथील मोजणीस विरोध करणा-या शेतक-यांवर केसेस झालेल्या दिसत कश्या नाहीत ?असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे .शासना विरोधात ४० केसेस औरंगाबाद, मुंबई, नागपूर उच्च न्यायालयात चालू आहेत. समृद्धी बाधीत शेतक-याचा लढा न्यायालयीन व लोकशाही मार्गाने सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्र्यानी पत्रकर परिषद घेऊन आरोप करण्यापेक्षा बाधीत शेतक-याच्या प्रश्नासाठी शेतकरी परिषद घ्यावी, असे आवाहन समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रचे समन्वय कॉ. राजू देसले, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, अॅड. रतनकुमार, तुकाराम भस्मे, भाऊसाहेब शिंदे, विनायक पवार, शहाजी पवार, दौलत दुभाषिक, रावसाहेब हारक, संतोष ढमाले, सदानंद वाघमारे, शिवाजी भोसले, कपिल धामणे, पांडुरंग मोकाशी, रमेश सहारे आदींनी केले आहे.