fbpx

आप कडून संविधान जाळल्याचा निषेध

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय गौरव चिन्ह अपमान अधिनियम 1971 प्रमाणे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, भारताचा नकाशा आणि संविधान याचा अपमान हा गंभीर गुन्हा असून त्याला तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 9 ऑगस्ट रोजी काही मनुवादी, धर्मांध आणि राष्ट्रद्रोही युवकानी केंद्र सरकारच्या अख़्यतारित असलेल्या पोलिसांच्या उपस्थितीत दिल्लीत जंतर मंतर येथे संविधान प्रत जाळली व तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. या सर्व प्रकारचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे.

सदरच्या व्हिडिओमध्ये हे तरुण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व संविधानातील आरक्षणाविषयी आक्षेपार्ह घोषणा देत असल्याचे दिसते आहे.

या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या आदेशानुसार दिल्लीमध्ये काम करणाऱ्या पोलिसांनी कशी परवानगी दिली? ह्या देशद्रोही कृतीला मोदी सरकारचा पाठिंबा आहे का? हे स्पष्ट होण्याची गरज आहे. संविधानाचा अपमान म्हणजे विविधता जपत समता,सहिष्णुता आणि संधीचा हक्क देणाऱ्या मुल्यांना विरोध ! गुन्हेगारांचे सत्कार करणारे, वकीली करणारे भाजपा सरकारातील अनेक जणांची विधाने आणि कृतीसुद्धा संविधान विरोधी आहेत, या सर्वच बाबी देशाला अधोगती कडे घेऊन जात आहेत याचाही आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे.

भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा ‘आप’च्या पाठीशी