वंदे मातरम’ संघटनेच्या वतीने अबू आझमी आणि वारीस पठाण यांचा निषेध

पुणे : येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयासमोर ‘वंदे मातरम संघटना, पुणे शहर’ यांचे वतीने अबू आझमी आणि ‘एमआयएम’ चे वारीस पठाण यांच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी या दोघांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तसेच त्यांच्या चित्रांवर ऑइल ओतून आंदोलन करण्यात आले. नुकतेच अबू आझमी यांनी ‘वंदे मातरम’ विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्याला ‘एमआयएम’ चे वारीस पठाण यांनीही दुजोरा दिला होता. या पार्श्वभूमीवर या दोघांच्या निषेधासाठी ‘वंदे मातरम’ संघटनेचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी अबू आझमी आणि वारीस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून निषेध करण्यात आला. तसेच ‘भारत माता कि जय’, ‘वंदे मातरम’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे सौरभ कर्डे, गंधार कर्डे, तरंग येवले, ओंकार वडके, अनिकेत करपे, ओंकार बेल्लम, सोमनाथ लोंढे, ओंकार पाटील, संदेश शितोळे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.