गौरी लंकेश हत्येच्या निषेधार्थ विद्यापीठात निषेध सभा

sfi

पुणे : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची मंगळवारी हत्त्या झाली. त्यामुळे देशभर निषेध आंदोलन होत आहेत. गुरवारी एसएफआय नी सावित्राबाई फुले विद्यापीठात निषेध सभा आयोजित केली होती. विद्यापीठातील अंकित कॅन्टीन समोर सायंकाळी सात च्या सुमारास निषेध सभेला सुरवात झाली,एसएफआय नी निषेध सभेत घोषणा देण्यास सुरवात केली. तेवढ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने मध्यस्थी करत एसएफआयच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या घोषणा देणे थांबवण्याचे सांगितले. त्यामुळे विद्यापीठात एसएफआय व अभावीप या दोन संघटना आमने सामने आल्या तसेच चर्चात्मक वाद झाला.

विद्यापीठात गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थी संघटनामध्ये तणावाचे वातावरण आहे. या दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांमधे हाणामारी झाली होती. त्यावर दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात  चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली होती. काल विद्यापीठात परत वाद होण्याची शक्यता होती मात्र विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना बोलावले. रात्री ९:३० सुमारास वाद मिटवण्यात आला. या संदर्भात अभाविप विद्यापीठ प्रमुख श्रीराम कंधारे यांचाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एसएफआय नी आयोजित केलेल्या निषेध सभेत गौरी लंकेश यांचा हत्येचा विषय सोडून घोषणा येत होत्या. तसेच एसएफआय नी सर्जिकल स्ट्राईक वर प्रश्न चिन्ह निर्माण केले. त्यामुळे आम्ही पण विद्यापीठात घोषणा दिल्या. गौरी लंकेश यांच्या हत्येचा अभावीप सुद्धा निषेध करते.