आपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत : हायकोर्ट

टीम महाराष्ट्र देशा : आपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत, त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची चौकशी निष्पक्षपणे करा, अश्या शब्दात आज हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला फटकारले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दाभोळकर-पानसरे यांची हत्या होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला असला तरी तपासात फारशी प्रगती नाही. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी वेळोवेळी राज्य सरकार आणि तपास करणाऱ्या संस्थांना चांगलंच झापलं. आज देशातील पुरोगामी व्यक्ती भीतीखाली वावरत आहेत. त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी करा, असे आदेश आज तपास यंत्रणांना हायकोर्टाने दिले आहेत.

गौरी लंकेशची हत्या आणि उजवे 

You might also like
Comments
Loading...