प्राध्यापकांचा २ फेबुवारीला एकदिवसीय संप

मुंबई : परीक्षा कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालाचे प्राध्यापक दोन फेबुवारीला एकदिवसीय संपावर जाणार आहेत. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिला आहे. मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अर्थात ‘मुक्टू’नं हा इशारा दिलाय.
सरकारनं प्राध्यापकांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या नसल्यानं हा बहिष्कार घालण्यात येणार आहे. त्यासंदर्भातलं पत्र ‘महाराष्ट्र राज्य बोर्डा’ला लिहिण्यात आल आहे. ५ फेब्रुवारीपासून बारावीची तोंडी परीक्षा सुरू होतेय. त्यावर बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे..

ऐन परीक्षांच्या कालावधीमधेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी २ फेब्रुवारीला संपाची हाक दिली आहे. त्याचबरोबर जेलभरो आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

७२ हजार प्राध्यापक यादिवशी संपावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी ‘मुक्टू’चे सरचीटणीस अनिल देशमुख यांनी केलीय.