प्राध्यापकांना कायमस्वरूपी नोकरी नाही म्हणून बायका मिळेनात

aurangabad vidapathat

औरंगाबाद: ‘ नौकरी असावी ती पण कायमस्वरूपी असावी अशा मुलाशीच मुली लग्न करतात. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना स्वतःच घर चालवणे सुद्धा कठिण असते. मग प्राध्यापकांना नोकरी केव्हा मिळणार आणि लग्न कधी होणार ..? शिक्षण आणि नौकरी मिळेपर्यंत वय ३५ ते ४० होत आहे.’ असा भावनिक मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या मतपत्रिकेसोबतच्या पत्रात मतदाराने उपस्थित केला. हे पत्र बेरोजगारीची भीषणता दर्शवणारे आहे, दहा जागांसाठी गुरुवारी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्या वेळी ही मतपत्रिका सर्वांसमोर आली.

मार्च २०१७ रोजी लागू झालेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट-२०१६ नुसार पहिल्यांदाच विद्यापीठीय प्राधिकरणाच्या निवडणुका होत आहेत. याआधी पदवीधर अधिसभा व्यतिरिक्त पाच गटांतील निवडणुका होऊन त्याचा निकालही घोषित झाला आहे. पदवीधर मतदारसंघात २९ हजार मतदारांची नोंदणी आहे. १० जागांसाठी डिसेंबरला मतदान झाले. गुरुवारी अनुसूचित जाती प्रवर्गातील मतमोजणीत सायंकाळी ७.१५ मिनिटांनी बीड जिल्ह्यातील पेटीत एका मतपत्रिकेला पत्र लिहिलेले आढळले. सामाजिक चळवळीशी नाळ जोडलेले विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी ते मतमोजणी केंद्रातील एलईडीवर झळकवत ध्वनिक्षेपकावर वाचूनही दाखवले. त्या मतदाराने वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून शैक्षणिक क्षेत्रातील वेठबिगारी निदर्शनास येते आहे. स्वतंत्र पत्राद्वारे मजकूर लिहिल्याने ही मतपत्रिका ग्राह्य धरण्यात आल्याचे डॉ. सरवदे यांनी सांगितले.

Loading...

काय होता पत्रातील मजकूर

‘आज ग्रॅज्युएट मुलाला कायमस्वरूपी नोकरी नसल्याने लग्नात अडचणी येतात. मुलगी म्हणते जॉब भरोश्याचा पाहिजे. हा मुद्दा जरी निवडणुकीचा नसला तरी आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विवाहेच्छुक अनेक मुला-मुलींचे वय विवाह जुळत नसल्यामुळे ३५ ते ४० झाले आहे. तरी कायम फिक्स पे का होईना जॉब मिळाला पाहिजे. अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स, बीए, एमए, बीएस्सी, एमएस्सी, बीकॉम, एमकॉम बेकार आहेत. बघा काही करता येते का..?’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये