धक्कादायक; राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकाने ‘कृष्णकुंज’बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही, असा आरोप या शिक्षकाने केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, असं म्हणतं या शिक्षकाने राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

You might also like
Comments
Loading...