‘अण्णा हजारे म्हणजे मिडीयाने मोठे केलेले अत्यंत खुजे आणि आत्मकेंद्रित गृहस्थ’

anna hazare - hari narake

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या मंदिर बचाव समितीनं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. बंद मंदिरे खुली करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली.त्यावर अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. दारूची दुकाने सुरू केली. मंदिरे खुली करण्यात सरकारला काय अडचणी आहेत, असा सवाल त्यांनी केला. १० दिवसांत मंदिरं खुली करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर जेलभरो आंदोलन करा, मी तुमच्या सोबत आहे, असं अण्णा म्हणाले आहेत.

त्यानंतर आता अण्णा हजारे यांच्या या भूमिकेवरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यावरून आता प्रा.हरी नरके यांनी प्रतिक्रिया देत अण्णा हजारे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘अण्णा हजारे म्हणजे मिडीयाने मोठे केलेले अत्यंत खुजे आणि आत्मकेंद्रित गृहस्थ. लोकपाल कायदा मोदी सरकारने गुंडाळून ठेवला. RTI कायदा कारण नसतांना Dilute केला. त्यावर आंदोलन करणे सोडून आता ते मंदिर खुले करण्याचे आंदोलन करणार असल्याचे समजले. असा टोला नरके यांनी लगावला आहे.

तर, ‘मंदिरांचे अर्थकारण म्हणजे पुरोहितशाही मजबूत करणारे वर्चस्ववादी सत्ताशस्त्र. अण्णांचा पोपट गेली सात ७ वर्षे प्रसिद्धीअभावी लुडकला होता. प्रसिद्धीचा रोग मोठा वाईट. प्रसिद्धी नसेल तर अण्णांना जेवण कसे जाणार? आत अर्धी चड्डी अन् वर धोतर घालणाऱ्या अण्णांचे इतके अधःपतन झाल्याचे पाहून वाईट वाटते. ‘राळेगण’ या देशाचे दुर्दैव!’ असा जोरदार घणाघात हरी नरके यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या