#MeToo : ‘संस्कारी’ आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा- तनुश्री दत्ता पाठोपाठ आता बॉलिवूडमध्ये शोषण झालेल्या महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागली आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांच्या मागोमाग विकास बहल, कैलाश खेर, चेतन भगत, उत्सव चक्रवर्ती आदी बॉलिवूडकरांची नावे महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये दोन गट पडलेले सुद्धा दिसत आहेत.

Loading...

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकानंतर एक खुलासे होत आहेत. आता अभिनेते आलोक नाथ यांच्यावर एका चित्रपट निर्मातीने बलात्काराचा आरोप केला आहे. आलोक नाथ यांच्यासोबत काम केलेल्या निर्मात्या विंटा नंदा यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. तब्बल २० वर्षांनंतर ही घटना उघडकीस आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. नंदा यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून ही घटना उघडकीस आली आहे.

तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा मी 1994 साली ‘तारा’ या मालिकेसाठी लिहीत होती आणि निर्मीती करत होते तेव्हा माझ्यासोबत शारीरिक दुर्व्यवहार करण्यात आला. या पोस्टम्ये तिने काही अशा गोष्टी लिहील्या आहेत ज्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या संपूर्ण पोस्टमध्ये तिने कुठेच आलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही पण ही पोस्ट वाचल्यामुळे तुम्हाला कळेल की तिने कुणावर निशाणा साधला आहे.

मुग्धा कऱ्हाडेची ‘तोडफोड’ सोशल मिडीयावर हिट

विक्रम ‘हे’ नाटक तू बसवं त्यात मी काम करेन; नानांनी व्यक्त केली इच्छाLoading…


Loading…

Loading...