दहावी, बारावी परीक्षा अर्ज भरना प्रकिया १५ स्प्टेंबरपासून 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठीचा अर्जाचा नमुना मंडळाच्या संकतेस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अर्ज वेळेत भरता यावा यासाठी शाळा व महाविद्यालयांना माहिती संकलित करण्याचे सांगितले आहे.

यामध्ये नावाचे अचूक विद्यार्थ्यांचे अचूक स्पेलिंग, जन्मदिनांक, आईचे नाव, जन्मस्थळ, परीक्षेचे विषय व माध्यम, विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईजचे छायाचित्र व स्कॅन केलेली सही व विद्यार्थी अर्ज भरताना कला, चित्रकला, लोककला व क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी अर्ज करणार आहे किंवा नाही, याबाबत उल्लेख करणे ही माहिती शाळा व महाविद्यालयांनी ठेवावी असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.