समस्यांच्या निराकरणासाठी केला जाणारा खर्च वायफळ नाही – हेमंत टकले

hemant takle

नागपूर   – लोकशाही परंपरेत निर्माण झालेल्या व्यवस्थेबद्दल प्रत्येक गोष्ट रुपयात मोजू नये असं म्हणतात त्यामुळे या समस्यांचं महत्व लक्षात घेवून त्याच्या निराकरणासाठी केला जाणारा हा खर्च आहे त्यामुळे तो वायफळ खर्च आहे असं अजिबात नाही असे स्पष्ट मत विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी मांडले.

अर्थमंत्र्यांनी या अधिवेशनाला एका मिनिटाला ७० हजार रुपये खर्च होतात असं वक्तव्य केलं त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेमधील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी मिडियाशी बोलताना वरील मत मांडले आहे.

लोकशाहीमध्ये निर्माण झालेल्या या संस्था आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित विचार करुन त्यांच्याकडे जे भाग आहेत त्याचा सामान्य माणसाला जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने सेवा कशा देता येतील यासाठी सभागृहाचे कामकाज चालते त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतो ही संकेताने घालून दिलेली व्यवस्था आहे असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.

सत्तेवर असले किंवा या एकूण व्यवस्थेवर खर्चाचा मुद्दा अर्थमंत्र्यांनी मांडला की, एका मिनिटाला अमुक एवढे पैसे खर्च होतात. एकूण कोटयावधी रुपये जातात. हा अतिशय मुल्यवान वेळ आहे. तो अशापध्दतीने जावू नये. आता हे दवडला जावू नये याची जबाबदारी जशी विरोधी पक्षांची आहे तशीच ती सत्ताधारी पक्षाची आहे अशी आठवणही अर्थमंत्र्यांना आमदार हेमंत टकले यांनी करुन दिली.

जनतेची कामे व्यवस्थित होत असतील मग असा जर वेळ वाया गेला. एका मिनिटाच्या हिशोबाने सांगितला तर पावसात त्यादिवशी काय झालं किती मिनिटे आणि किती तास वाया गेले आणि त्याचा हिशोब लावला तर त्याची नुकसान भरपाई कुणाकडून वसूल करुन घेणार. या सरकारकडून घ्यायची का आणि मग विरोधी पक्ष ज्या मुद्दयावर हे सगळं घडवतात त्या मुद्दयांना योग्य उत्तर देता आलं नाही तर अशा पध्दतीने घडत असतं. विरोधी पक्षाकडे जी आयुधे आहेत त्याचा वापर करुनच विरोधी पक्ष आपलं म्हणणं शासनासमोर मांडत असतो असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.

प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी ३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित – हेमंत टकले