शेतकरी कर्जमाफीला आता आचारसंहितेचा खोडा?

farmer

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी अडचणी येत आहेत. आधीच सरकारकडून लावण्यात आलेल्या निकषांची यादी मोठी आहे. तसेच स्वत:चे नाव हि लिहू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. त्यातच आता राज्यात सात हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सात व १४ ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने मतदारांवर प्रभाव टाकणारे निर्णय सरकारला घेता येणार नाहीत. त्यामुळे निवडणुकां आधी हि रक्कम देयची असल्यास सरकारला राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेणे कायदेशीरदृष्टय़ा बंधनकारक आहे.

दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले आहेत. आता याबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला असून निवडणुकी आधी कर्जमाफीची रक्कम दिल्यास भाजपला त्याचा चांगलाच राजकीय लाभ होणार आहे.