प्रो-कबड्डी लीग : दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा आज लिलाव

टीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.दरम्यान आजच्या दिवशी दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यामुळे या फळीतल्या कोणत्या खेळाडूवर किती रकमेची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती.दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली.यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Loading...

संघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –

बंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह
बंगळुरु बुल्स – रोहीत कुमार
दबंग दिल्ली – मिराज शेख
गुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत
हरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह
पटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप
पुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक
तामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार