प्रो-कबड्डी लीग : विराज लांडगे दबंग दिल्लीच्या ताफ्यात

टीम महाराष्ट्र देशा-  प्रो-कबड्डी लिलावात गुरुवारी विराज लांडगेला दबंग दिल्ली संघाने २५ लाख रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. २५ वर्षीय पुणेकर विराज बी कॅटेगिरीमध्ये होता. त्याची बेस प्राईज १२ लाख रुपये होती.

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.दरम्यान आजच्या दिवशी दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यामुळे या फळीतल्या कोणत्या खेळाडूवर किती रकमेची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती.दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली.यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

संघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –

बंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह
बंगळुरु बुल्स – रोहीत कुमार
दबंग दिल्ली – मिराज शेख
गुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत
हरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह
पटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप
पुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक
तामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू