प्रो-कबड्डी लीग live updates : प्रशांत कुमार राय वर ७९ लाखांची बोली

blank

टीम महाराष्ट्र देशा- पहिल्या सत्रात प्रशांत कुमार रायला लॉटरी लागली असून त्याला उत्तर प्रदेशकडून ७९ लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तर दुसऱ्या बाजूला प्रो-कबड्डी लिलावात गुरुवारी विराज लांडगेला दबंग दिल्ली संघाने २५ लाख रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. २५ वर्षीय पुणेकर विराज बी कॅटेगिरीमध्ये होता. त्याची बेस प्राईज १२ लाख रुपये होती.

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.दरम्यान आजच्या दिवशी दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यामुळे या फळीतल्या कोणत्या खेळाडूवर किती रकमेची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती.दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली.यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

live updates

विनोद कुमार २२.२५ लाखांच्या बोलीवर मुंबईकडून खेळणार
हरयाणा स्टिलर्सची विकास कंडोलावर ४७ लाखांची बोली, एफबीएम कार्डाचा केला वापर
जसवीर सिंहवर तामिळ थलायवाजची १२ लाखांची बोली
सचिन शिंगाडेवर हरयाणा स्टिलर्सची २० लाखांची बोली
रोहित राणा १२ लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडे
आशिष कुमार सांगवानवर बंगळुरु बुल्स कडून २३.५ लाखांची बोली
रवी कुमार १६ लाखांच्या बोलीवर पुणेरी पलटण संघाकडून खेळणार
जोगिंदर नरवाल ३३ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडून खेळणार
राजगुरू सुब्रमण्यम १२ लाखांच्या बोलीवर यू मुम्बाकडून खेळणार
विशाल माने ४५ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडून खेळणार
धर्मराज चेरलाथन ४६ लाखांच्या बोलीवर यू मुम्बा संघाकडून खेळणार
मात्र एफबीएम कार्डाचा वापर करत दिल्लीने विराजला संघात कायम राखलं                                        विराज विष्णु लांडगेवर यू मुम्बाची २५ लाखांची बोली
सतपाल १२ लाखांच्या बोलीवर दिल्लीकडून खेळणार
उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणार सागर
दुसऱ्या दिवशी पहिली बोली लागली. सागर कृष्णावर १४.२५ लाखांची बोली
लागोपाठ ३ खेळाडूंवर कोणत्याही संघमालकांकडून बोली नाही
अनुभवी खेळाडू राकेश कुमारवर बोली नाही                                                                                           १२ लाखांच्या बोलीवर आर. श्रीराम यू मुम्बा संघाकडे
सेल्वामणी १५ लाखांच्या बोलीवर जयपूर पिंक पँथर्स संघाकडे
अजय कुमार २५ लाखांच्या बोलीवर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडे
शब्बीर बापू १५.५ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्ली संघाकडे
चंद्रन रणजित ६१.२५ लाखांच्या बोलीवर दबंग दिल्लीकडून खेळणार
सुरजित सिंह १२ लाखांच्या बोलीवर तामिळ थलायवाजच्या संघात
सुरिंदर सिंहवर १२.२५ लाखांची बोली, पाटणा पायरेट्स संघाकडून खेळणार
दर्शन कादीयान १२ लाखांच्या बोलीवर यू मुम्बाकडून खेळणार
दुसऱ्या फळीतल्या प्रशांत कुमार रायला १२ लाखांवरुन थेट ७९ लाखांची बोली
महेश गौड १२ लाखांच्या बोलीवर बंगाल वॉरियर्स संघाकडून खेळणार

संघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –

बंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह
बंगळुरु बुल्स – रोहीत कुमार
दबंग दिल्ली – मिराज शेख
गुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत
हरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह
पटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप
पुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक
तामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू