Pro Kabaddi Season 6 Auction Live Updates: जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात?

टीम महाराष्ट्र देशा- प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमात यावेळी सर्वाधिक बोलीत कोटीचा आकडा पार होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी पाचव्या मोसमात नितीन तोमरला उत्तर प्रदेशने ९३ लाखाला आपल्या ताफ्यात घेतले होते. यावेळी यू मुम्बा, जयपूर पिंक पँथर्स आणि यूपी योद्धा या संघांनी एकही खेळाडू आपल्या ताफ्यात राखलेला नाही. बाकी ९ संघांनी काही खेळाडू राखले आहेत. त्यामुळे हे तीन संघ मोठ्या बोली लावून प्रमुख खेळाडूंना काबीज करण्याचा प्रयत्न करतील. त्यातूनच बोलीचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान,फ्रँचायजीजने पूर्वीचे ४ इलायीट खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना लिलावात एका वेळेस “फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येणार आहे. यात फ्रँचायजीज आपल्या पूर्वीच्या पण कायम न केलेल्या खेळाडूवर लागलेल्या महत्तम बोली इतकी बोली लावून त्या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात घेऊ शकते. जर फ्रँचायजीजने ४ पेक्षा कमी खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना दोनदा ” फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येईल.

१९ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यावेळी तब्बल ३००० खेळाडूंची निवड चाचणी १८ वेगवेळ्या शहरात घेण्यात आली. ८७ खेळाडू हे यावेळी एकूण ४२२ खेळाडूंमधील ५८ खेळाडू विदेशी असतील तर ८७ खेळाडू हे “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातील असतील.सहाव्या हंगामासाठीचा लिलाव आज मुंबईत पार पडला जाणार आहे, सहाव्या हंगामासाठी काही संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात कायम राखलं आहे, तर काही खेळाडूंनी एकाही खेळाडूंनी कायम न ठेवता संपूर्णपणे नव्या रणनितीने मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे.

संघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –

बंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह
बंगळुरु बुल्स – रोहीत कुमार
दबंग दिल्ली – मिराज शेख
गुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत
हरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह
पटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप
पुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक
तामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू

Loading...

 

4 Comments

Click here to post a comment