प्रो कबड्डीच्या लिलावात अर्धा डझन खेळाडू करोडपती, मोनू गोयत सर्वात महागडा खेळाडू

टीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.

तेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती.दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली.यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Loading...

संघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –

बंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह
बंगळुरु बुल्स – रोहीत कुमार
दबंग दिल्ली – मिराज शेख
गुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत
हरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह
पटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप
पुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक
तामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
त्या ५० तबलिगींनी लवकरात लवकर पुढे यावे, अन्यथा....
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला 'इशारा'; मदत केली तर ठीक, अन्यथा…
निलेश राणेंचा राज्यसरकारवर घणाघात, म्हणाले....
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
'जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, नाहीतर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा