प्रियंका गांधींची ट्विटरवर ग्रँड एन्ट्री; काही तासातच ७२ हजार फॉलॉअर्स

टीम महाराष्ट्र देशा – प्रियंका गांधी या आज उत्तर प्रदेशातील रोडशो सुरू होण्याआधी ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत. प्रियंका गांधींच्या ट्विटरवर एन्ट्रीनंतर काही तासांमध्ये त्यांचे फॉलॉअर्स ७० हजारांच्या पुढे गेले आहेत.

मेगा रोड शो मधून प्रियंका गांधींनी आज भारतीय राजकारणात धमाकेदार एन्ट्री केली आहे. त्यासोबतच त्यांनी ट्विटरवर एन्ट्री केली आहे.

प्रियंका फक्त 7 लोकांना फॉलो करत आहेत. त्यामध्ये काँग्रेस, राहुल गांधी, सचिन पायलट, अशोक गेहलोत, अहमद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.Loading…
Loading...