प्रियांका गांधी यांना ‘डेंग्यू’ची लागण; रुग्णालयात उपचार सुरू

नवी दिल्ली  : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचेप्रमुख डी. एस. राणा यांनी सांगितले.

प्रियांका यांना सुरुवातीला ताप आला असल्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चाचणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी २३ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, दिल्लीमध्ये ६५७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर दिल्ली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ३२५ रुग्ण दिल्लीतील असून उर्वरीत ३३२ रुग्ण अन्य राज्यांतील आहेत. देशभरात ३६ हजार ६३५ डेंग्यूचे रुग्ग्ण आढळून आले आहेत.