अखेर काँग्रेसमध्ये प्रियंका गांधींकडे असणार ‘ही’ जबाबदारी , राहुल गांधींचा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी पक्ष बळकट करत जनतेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतानाच काँग्रेसकडून एक महत्त्वाची खेळी करण्यात आली. प्रियांका गांधी यांनी अखेर सक्रिय राजकारणात प्रवेश करत काँग्रेसच्या महासचिव पदाची धुरा सांभाळली आणि राजकीय चर्चांना वेगळीच कलाटणी मिळाली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, याचा अखेर खुलासा केला आहे.

काँग्रेसच्या महासचिव म्हणून प्रियांका गांधी यांची भूमिका फक्त उत्तर प्रदेशपूरतीच मर्यादित नसून, राष्ट्रीय पातळीवरही त्या अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण प्रियांकाला एक काम दिलं असून आता त्या कामाच्या यशावरच पुढील कामं (जबाबदारी) देणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.