…तर प्रियांका गांधी अमेठीतून लढणार

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र या दोन्ही मतदारसंघातून ते जर विजयी झाले तर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या अमेठीतून निवडणुकीला उभे राहू शकतात असे संकेत स्वतः प्रियांका गांधी यांनी दिले आहेत.

राहुल गांधी जर अमेठी आणि वायनाडमध्ये विजयी झाले तर तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवाल का असा प्रश्न प्रियांका गांधींना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘हे आव्हान नाही’ असे म्हटले. हे तेव्हाच निश्चित केले जाईल जेव्हा माझा भाऊ दोन्ही मतदारसंघापैकी एक सोडण्याचा निर्णय घेईल. तेव्हा चर्चा होईल, असे त्या म्हणाल्या.