वाराणसी मधून निवडणूक का नको लढवू ? प्रियांका गांधीचा कार्यकर्त्यांना प्रश्न

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक न लढवता पक्षाच्या प्रचार करण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी घेतला होता. मात्र आता प्रियांका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय अशा चर्चा रंगत आहेत. कारण रायबरेली येथे प्रचारा दरम्यान प्रियांका गांधी यांना कार्यकर्त्यांनी आपण रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी गळ घालण्यात आली. त्यावर प्रियांका गांधी यांनी वाराणसी मधून निवडणूक का नको लढू असा मिश्कील प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला.

रायबरेली या मतदार संघातून कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या निवडणूक लढवत आहेत. मात्र काही कारणास्तव सोनिया गांधी या कार्यकर्त्यांच्या भेटीला येऊ शकल्या नाहीत त्यामुळे प्रियांका गांधी यांनी रायबरेली येथी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपणचंं या मतदार संघाचे नेतृत्व करावे अशी मागणी प्रियंका यांच्या कडे केली. त्यावर ‘वाराणसीतून निवडणूक का नको लढवू ?’ असा प्रतिप्रश्न प्रियांकांनी कार्यकर्त्यांना हसत विचारला.

यावेळी प्रियांका म्हणाल्या की , रायबरेली मतदारसंघातील कामाकडे आपण लक्ष देऊन आहोत. तसेच रायबरेलीच्या विकासाची हमी आम्ही सोनिया गांधी यांना सुद्ध दिली आहे. तसेच पक्षाची इच्छा असल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं प्रियांका गांधी यांनी एक दिवस आधीच सांगितलं होतं.

दरम्यान प्रियांका गांधी म्हंटल्या प्रमाणे त्यांनी जर वाराणसी मधून निवडणूक लढवली तर ही निवडणूक देशाच्या इतिहासातली एक निवडणूक ठरेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे प्रियांका या जर मोदीं विरुद्ध वाराणसी मतदार संघात उतरल्या तर देशाला मोठी लढत पाहायला मिळेल.