fbpx

प्रियंका गांधी लोकसभेला लढणार या मतदार संघातून?

टीम महाराष्ट्र देशा – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर प्रियंका गांधींची यांची निवड झाली. प्रियंका यांच्या या एन्ट्रीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रियंका गांधी या अमेठीतून सोनिया गांधी यांच्या जागी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती महाराष्ट्र देशाला विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

सोनिया गांधी यांनी १९९९ साली अमेठीतून पहिली निवडणूक लढवली होती. २००४मध्ये राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबीयांचे गड मानले जातात. आता आगामी निवडणूक प्रियंका गांधी अमेठी मतदार संघातून लढणार असल्याचे कळते आहे.

सोनिया गांधी यांच्याकडून राजकारणाला सोडचिठ्ठी मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे. त्यामुळेच काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर प्रियंका गांधींची निवड केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीला अमेठी मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे.

प्रियंका गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याचीही जोरदार चर्चा सध्या देशाच्या राजकारणात सुरू आहे. १९९९ सालापासून प्रियंका या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे काम पाहत आल्या आहेत. आपल्या आईच्या व भावाच्या मतदारसंघात इतके वर्ष काम केल्यानंतर प्रियंका गांधींना काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.

1 Comment

Click here to post a comment