२०१९ ची निवडणूक सोनिया गांधींच्या जागी प्रियांका गांधी लढवणार ?

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ ची लोकसभा अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. या चर्चेला आता आणखी एक वाट मिळाली आहे ती म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून सोनिया गांधींच्या ऐवजी प्रियांका गांधी निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही निवडणूक प्रियांका गांधी लढवणार आहेत कारण हल्ली सोनिया गांधींची प्रकृती स्थिर नसते, आणि दुसर म्हणजे पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रियंंकां गांधी ही निवडणूक लढवणार आहेत की नुकतीच राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान पदासाठी मिहिला उमेदवाराला पाठींबा देऊ अस वक्तव्य केल होत. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती मात्र आता प्रियंका गांधीचे नाव पंतप्रधान पदासाठी समोर येऊ शकत अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. भाजपच्या विजयामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला होता. या पराभवानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान आता भाजपा उत्तर प्रदेश मधील अमेठी आणि रायबरेलीवर आपलं लक्ष्य केंद्रित करणार आहे. त्यामुळ काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांची मागणी होत आहे.  काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी यांना प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करायला हवे. जर असं झालं तर काँग्रेसला विजय मिळू शकतो अशी कबुलीच शर्मांनी दिली. राहुल गांधी मेहनत करताय. त्यांना पंतप्रधान सुद्धा व्हायचंय. पण दोघांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.भाजपला उत्तर द्यायचं असेल आणि जास्तीत जास्त जागांवर निवडून यायचं असेल तर प्रियांका गांधींशिवाय पर्याय नाही यामुळे या हालचालीना वेग आला आहे.

मराठ्यांना यश मिळणारच, राजू शेट्टींनी व्यक्त केला विश्वास