प्रियांका गांधी त्यांच्या नवऱ्याच्या नावापेक्षा माझे नाव जास्त घेतात : स्मृती इराणी

टीम महाराष्ट्र देशा : पाच वर्षांपूर्वी प्रियांका गांधी यांना माझे नाव देखील माहित नव्हते, पण पाच वर्षात चित्र बदलले. सध्या प्रियांका गांधी या त्यांच्या नवऱ्याच्या नावापेक्षा माझे नाव जास्त घेतात. असा सणसणीत टोला अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना लगावला आहे. एका वृत्तसंस्थेने यासाबंधित वृत्त दिले आहे.

दरम्यान, अमेठीमध्ये एका रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याच्या घटनेवरूनही स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विश्वस्त असलेल्या एका रुग्णालयात उपचारांअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्या रुग्णाकडे आयुष्यमान भारतचे कार्ड असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी गांधी घराण्यावरही टीका केली. एका निर्दोष व्यक्तीला केवळ राजकारणासाठी मृत्यूच्या दरीत लोटण्यास हे कुटुंब तयार असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा