आयएनएक्स घोटाळा : चिदंबरम यांनी प्रामाणिकपणे देशसेवा केली, प्रियांका गांधींचा अजब दावा

टीम महाराष्ट्र देशा- आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात सर्वोच्च न्याययालयात धाव घेणाऱ्या चिदंबरम यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला असून सरन्यायाधीशांकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आजच यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आयएनएक्स मिडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर, काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला ते कुठंच सापडले नाहीत. त्यामुळे दोन तासात सीबीआयपुढं हजर व्हा, अशी नोटीस त्यांच्या घरावर चिकटवून या पथकाला परत यावं लागलं. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मधे आयएनएक्स या माध्यमसमूहाला ३०५ कोटी रुपयांचा परदेशी निधी स्वीकारण्यासाठी परवानगी देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. चिदंबरम यांनी प्रामाणिकपणे देशसेवा केली आहे. त्यांनी न अडखळता या सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर सूड उगवला जात आहे. मात्र आम्ही लढा देत राहू, असे ट्विट प्रियंका यांनी केले आहे.

उच्च विद्याविभूषित आणि राज्यसभेचे सदस्य असलेल्या पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री पदासह अनेक दशकांपासून देशाची सेवा केली आहे. सध्या कोणतीही भीती न बाळगता ते सध्याच्या सरकारचे अपयश जनतेसमोर मांडत आहेत. हेच सत्य डोकेदुखी ठरत असल्याने त्यांना त्रास दिला जात आहे. सूड उगवत आहेत. मात्र आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत. निकाल काही येणार असला तरी आम्ही निरंतर लढा देत राहू, असे प्रियंका यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान,पी चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येईपर्यंत जबरदस्तीने काहीही कारवाई करू नये, असं चिदंबरम यांच्या वकीलांनी म्हटलं आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग – सीबीआयचं पथक आज सकाळी पुन्हा चिदंबरम यांचा शोध घेत, त्यांच्या निवासस्थानी दाखल झालं, त्यावेळी चिदंबरम यांच्या कायदे सल्लागारांच्या पथकानं सीबीआयच्या पथकाला ही विनंती केली. दरम्यान चिदंबरम या निवासस्थानी नसल्यानं, सीबीआय पथकाला रिकाम्या हाताने परतावं लागलं.

महत्वाच्या बातम्या