fbpx

प्रियांका गांधी मानसिक रोगी , त्या लोकांना मारत सुटतील – सुब्रह्मण्यम स्वामी

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली आहे.

प्रियंका गांधींना मानसिक आजार असून, तोल सुटका की त्या लोकांना मारहाण करतात, अशा शब्दात स्वामींनी प्रियांका गांधींवर टीका केला. प्रियंका गांधी यांना बायपोल्ट्री नावाचा मानसिक आजार असून, तोल सुटका की लोकांना मारहाण करतात. सार्वजनिक जीवनात वावरताना हे घातक ठरू शकतं. प्रियांका गांधींचा स्वत:वरील ताबा कधी सुटेल हे सांगता येत नाही, असा शब्दात सुब्रह्मण्यम स्वामींनी प्रियांका गांधींवर टीका केली.

दरम्यान, नेत्यांची प्रियांका गांधीवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. विनोद झा, कैलास विजवर्गीय यांचाही तोल घसरला आहे. प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांची त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

1 Comment

Click here to post a comment