fbpx

तब्बल ६ तासांच्या भव्य दिव्य रॅली नंतर प्रियंका गांधी पोहोचल्या लखनऊ कार्यालयात

टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षाने प्रियांका गांधी हे नवे अस्त्र बाहेर काढले आहे. उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदी प्रियांका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली असून आज लखनऊ मध्ये भव्य रॅली काढून कॉंग्रेसने आपले शक्ती प्रदर्शन केले आहे . या रॅलीला जनतेकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. गर्दीमय वातावरणात ही भव्य रॅली ६ तासानंतर काँग्रेसच्या लखनऊ कार्यालयात पोहोचली.

यावेळी राहुल गांधी यांनी कॉंग्रेस समर्थकांना संबोधित केले. तसेच ‘चौकीदार चोर है’ असा जोरदार नारा देखील दिला. राहुल गांधींकडून नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर बेरोजगारी , राफेल करार या विषयांना घेवून हल्ला चढवण्यात आला. तसेच उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणायची जबाबदारी मी प्रियंका गांधींवर सोपवली आहे अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

यावेळी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियांका गांधी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. तसेच प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रां यांनी आपल्या सोशल नेट्वर्किंग साईट वरून ‘मी आज पासून प्रियांकाला देशाच्या हवाली करत आहे’ अशा आशयाची भावनिक पोस्ट केली आहे.