मेगा रोड शो मधून प्रियंका गांधींची भारतीय राजकारणात धमाकेदार एन्ट्री

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये होणाऱया प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होणार असल्याचे ट्विट केले आहे. दुपारी लखनऊ विमानतळापासून पक्षाच्या मुख्यालयापर्यंत रोड शो होणार असल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या ४ दिवसीय दौऱ्यात प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह ते उपस्थित राहतील.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लखनौमध्ये दाखल झाल्या असून थोड्याच वेळात रोड शोला सुरुवात करणार आहेत. राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही लखनौमध्ये दाखल झाले असून विमानतळाबाहेर स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर देखील धमाकेदार एन्ट्री घेतली .