पक्षाने दिली प्रियांका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी

टीम महारष्ट्र देशा : कॉंग्रेस म्हंटल की गांधी घराण्याच नाव अग्रेसर असत आता आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या पाठोपाठ प्रियांका गांधी देखील सक्रीय राजकारणात  दिसणार आहेत. त्यांच्यावर पक्षाने उत्तरप्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे.

याआधी गुलाम नबी आझाद हे उत्तरप्रदेशचे सरचिटणीस होते. पण आता हा पदभार प्रियांका गांधी यांना देण्यात आला आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशासाठी काँग्रेसने पहिल्यांदाच दोन सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे.

प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे गांधी कुटुंबाचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भयंकर खुश झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निवडीबाबत बोलताना म्हटलंय की या निवडीचा फक्त त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागावरच परीणाम होणार नसून संपूर्ण देशभरात फरक पडेल.