fbpx

‘मोदींनी अभिनेत्याशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा’

मुंबई : बॉलिवूड कलाकार अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी मुलाखात घेतली आहे. या मुलाखातीत अक्षय कुमारने मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. मोदींकडूनही या प्रश्नांना उत्तम प्रतिसाद मिळला. विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींवर निशाणा साधण्यास सुरुवात केली असून मोदी यांनी अभिनेत्याशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा असे परखड मत काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेश मधील महोब दौऱ्यादरम्यान प्रियांका गांधी बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, तुम्ही पाहिले असेल मोदी मोठ मोठ्या अभिनेत्यांची संवाद साधत आहेत. कधी तुम्ही त्यांना जनतेमध्ये पाहिले आहे का? वाराणसीमध्ये दौऱ्यावर गेले होते. गेले पाच वर्ष पंतप्रधान मोदी कोणत्याही गावात आले नसल्याची माहिती समोर आली. खरतर मोदींनी अभिनेत्यांशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधने गरजेचे आहे असे सांगितले.

दरम्यान,माझेच प्रश्न आणि माझीच उत्तरे ही नरेंद्र मोदींची वृत्ती कायम आहे. अक्षयकुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली नसून मोदींनी अक्षयकुमारला प्रश्न विचारायला सांगितलं आहे. प्रश्नांची यादीही मोदींनीच दिली असणार, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी ट्विटकरत मोदींवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी मुलाखतीवर खोचक टीका करतानाच नरेंद्र मोदी यांनी रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्यावी, असा टोला लगावला आहे.