fbpx

सोनभद्र पीडितांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींना अटक

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी अटक केली आहे. सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. सोनभद्र हत्याकांड प्रकरणात १० जणांची हत्या झाली होती.

या हत्याकांडामुळे सोनभद्र परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रियांका गांधींना रोखलं. त्यानंतर प्रियांका गांधींनी रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन सुरु केलं असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर ‘पोलीस आम्हाला ताब्यात घेऊन कुठे नेत आहेत हे आम्हालाही माहीत नाही. मात्र आम्ही कुठेही जाण्यास तयार आहोत’ अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली.