प्रियांका वाड्रा नव्हे तर मोदींविरुद्ध काँग्रेसकडून ‘हा’ उमेदवार लढवणार निवडणूक

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता 4 टप्पे उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून काँग्रेसच्याउत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका वाड्रा यांना उमेदवारी देण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अनेकदा प्रियंका गांधी यांनी तसे संकेतही दिले होते. काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले तर लढेन असे त्यांनी प्रसारमाध्यमांनाही सांगितले होते. मात्र, काँग्रेसने वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. अजय राय हे २०१४ मध्येही मोदींविरोधात रिंगणात उतरले होते.

२०१४मध्ये वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळच्या मोदी लाटेत केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला होता.

आता परिस्थिती बदलल्यानं प्रियांकांनी मोदींना आव्हान देण्याची तयारी केली होती. मात्र, स्थानिक परिस्थिती पाहता प्रियांकांना ही निवडणूक जिंकणे अवघड असल्याचं पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आलं. त्यामुळं अखेरच्या क्षणी काँग्रेसनं निर्णय बदलल्याचं कळतं.