… म्हणून प्रियांकाला सोडावा लागला ‘भारत’

टीम महाराष्ट्र देशा : सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांचा भारत या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय प्रियांका चोप्राने घेतला आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे लवकरच लग्न करणार आहेत. यासाठी प्रियांकाने हा चित्रपट सोडल्याची चर्चा आहे.

प्रियांका चोप्राच्या वाढदिवशी त्यांचा साखरपुडा देखील झाल्याचं वृत्त आहे.नुकताच तिने काही दिवसांचा भारत दौरा केला होता. या दौऱ्यात तिच्यासोबत निकही दिसला. दोघंही गोव्यात काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले. त्यामुळे लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता.

प्रियांकानं न्यूयाॅर्कला नवं घरही खरेदी केलंय. 30 कोटींचं हे घर 82मजली इमारतीत आहे. या आलिशान घराचीही चर्चा सुरू होती.आता प्रियांका चोप्रा कधी लग्न करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा