अमेरिका : अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निर्णयात गर्भपाताचा घटनात्मक अधिकार रद्द केला आहे. असे करून, न्यायालयाने स्वतःचा पाच दशके जुना ऐतिहासिक निर्णय बदलला आहे जेथे महिलांना गर्भपात करण्यासाठी कायदेशीर दर्जा देण्यात आला होता. आता या निर्णयावर प्रियांका चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे.
या निर्णयावर प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट शेअर केल्या आहे. पहिल्या स्टोरीमध्ये प्रियंकाने व्यंगचित्र शेअर केले आहे. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.
दरम्यान, या निर्णयाला सगळ्यांनी विरोध केला होता. त्यामध्ये उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, अमेरिकेतील लोकांकडून घटनात्मक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांनी अमेरिकन जनतेला एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे. पुढे म्हणाल्या की, अमेरिकेतील लाखो स्त्रिया आरोग्य सेवेशिवाय आज रात्री झोपतील. हे आरोग्य सेवा संकट आहे. कमला हॅरिस यांनी अमेरिकन लोकांना गर्भपाताच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<