आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेल्या ‘या’ महिला नेत्यास राज्यसभेत जाण्याची इच्छा

shivsena flag

मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभा निवडणुका होणार आहेत. यात शिवसेनेसह कॉंग्रेसमध्येही  चढाओढ  सुरु झाली आहे. तर लोकसभेत पराभव झालेल्या नेत्यांमध्येही आता शर्यत सुरु झाली आहे. याच्शिवाय  अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असाही पक्षात मतप्रवाह आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे दिसतात.

Loading...

तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा आहे. सध्या 42 मतांचा कोटा असल्याने शिवसेनेचा एक खासदार हमखास निवडून जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर भाजपकडून उदयनराजेंचं तिकीटही जवळपास कन्फर्म असल्याचं बोललं जातं. आता शिवसेनेच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश