एका गाण्यामुळे चर्चेत आलेली प्रिया प्रकाशचे नवीन गाणे प्रदर्शित : पहा व्हिडिओ

priya

मुंबई : एका गाण्यामुळे लोकांच्या नजरेत आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश हिचे आता अजून एक नवीन गाणे आले आहे. फक्त आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्याने सगळ्यांच्या मनावर राज करणारी प्रिया अनेक वेळा सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. ‘ओरु अदार लव्ह’मधील व्हिडीओमुळे चर्चेत आलेली प्रिया आता आणखी एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. या चर्चा तिचे नवे गाणे प्रदर्शित झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

प्रिया प्रकाशच हे नवीन म्यूजिक व्हिडीओ आहे. हे एक तेलुगू गाणं असून आज मकर संक्रांतीच्या दिवशी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याचे नाव ‘लाडी लाडी’ आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित होणार याची माहिती एका पोस्टद्वारे दिली होती. त्या पोस्टमध्ये या म्यूजिक व्हिडीओचे पोस्टर प्रियाने शेअर केला आहे.

या गाण्यात प्रिया सोबत रोहित नंदन आहे. तर हे गाणं प्रिया आणि राहूल सिपलिगंजने गायले आहे. श्री चरण पकाला यांनी या गाण्याला म्युजिक दिले आहे. लवकरच प्रिया ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रियाच्या या गाण्याला देखील बरीच पसंती मिळत आहे. प्रियाच्या या गाण्यावरती लाईक्स पाऊस पडत आहे.

महत्वाच्या बातम्या