VIDEO- पहा प्रिया प्रकाश वारियर चा नवीन व्हिडीओ

हैदराबाद : यूट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया वारियर हि काही क्षणातच लोकप्रिय झाली. प्रिया वारियर काम करत असलेल्या ‘उरू अदार लव्ह’या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे काही क्षणातच लोकप्रिय झाली. एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली.

 

‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे प्रियाला असंख्य चाहत्यांची पसंती मिळाली. प्रिया आणि तिच्यासोबत दिसणारा अभिनेता अवघ्या काही सेकंदांसाठी दिसत आहेत. पण, त्यांच्या नात्यातील खोडकरपणा आणि त्यातून झळकणारं प्रेम या गोष्टी नेटकऱ्यांच्या मनाला भावल्या आहेत. काहींनी तर प्रियाचे फोटो मोबाईल आणि लॅपटॉपवर स्क्रीनसेव्हर म्हणूनही ठेवले आहेत. प्रियाप्रमाणेच तिच्यासोबत दिसणारा ‘तो’सुद्धा सध्या प्रकाशझोतात आला आहे. तिच्या हसण्याने घायाळ झालेल्या त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून अनेकांच्या मनात काही आठवणीसुद्धा जाग्या झाल्या आहेत.Priya Prakash Varrier Photos

मोहम्मद रोशन किंवा रोशन अब्दुल रहूफ या नावांनी तो ओळखला जातो. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय आहे. या दोघांनी तरुण विश्वाला नजरेने घायाळ केले आहे. प्रिया बरोबरच या मोहम्मद रोशन यानेही उत्तम काम केल आहे. व्हिडीओ ची प्रसिद्धी पाहता या दोघांच्या ‘उरु अदार लव्ह’ या आगामी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची लक्षण आहेत.

प्रियाच्या काही क्यूट एक्सप्रेशन्सची चर्चा थांबता थांबत नाही आहे. तिच्या डोळ्यांच्या खूणा आणि त्यावर घायाळ होणारे अनेक जण सोशल मीडियावर गाण्याचं फारच कौतुक करतायेत. या गाण्याने बघता बघता ४५ लाखांच्यावर व्ह्युज मिळवले आहेत. योगायोग व्हॅलेंटाईन्स डे सुरु असल्यामुळे या व्हिडिओ तरुणांनी डोक्यावर घेतले आहे.

Priya Prakash Varrier Photos

व्हॅलेंटाइनबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, ‘मी सध्या गर्ल्स कॉलेजमध्येच शिकते. कॉलेजमध्ये मुलगाच नसल्याने क्रशचा प्रश्नच येत नाही.  त्यामुळे सध्या कोणाला करायचे झालेच तर सिनेमातील हिरो रोशन अब्दुल रहूफच माझा व्हॅलेंटाइन होईल. ’प्रियाला संगीत आणि नृत्य या दोन्ही गोष्टींमध्ये रस आहे. तिने मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून गायनाचेही ती प्रशिक्षण घेत आहे. तिला बॉलिवूड गायकांमध्ये अरिजीतचा आवाज आवडतो. अरिजीतचे ‘चन्ना मेरेया’ हे गाणे तिला सर्वाधिक आवडते.

Priya Prakash Varrier Photos

अवघ्या एका दिवसात तिला इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले. जगभरात इन्स्टाग्रामवर एका दिवसात सर्वात जास्त फॉलोवर्स मिळवणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता ती तिसऱ्या स्थानावर आहे.

Priya Prakash Varrier Photos

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले आहे. प्रियाचे वडील प्रकाश वरियर सेंट्रल एक्साइज डिपार्टमेण्टमध्ये काम करतात. मुंबईत काही वर्ष नोकरी केल्यानंतर प्रकाश यांनी केरळमध्ये बदली करुन घेतली. प्रिया आई- बाबा, छोटा भाऊ आणि आजी- आजोबा यांच्या सोबत राहते.

Priya Prakash Varrier Photos

कोण आहे प्रिया वारियर?

प्रिया प्रकाश वारियर. ही दक्षिण भारतातली अभिनेत्री आहे. प्रिया अवघी १८ वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार हे गाणं आहे मल्ल्याळम सिनेमा ‘ओरु अदार लव्ह’ मधलं. या गाण्याचे बोल आहेत ‘मनिक्या मलराया पूवी’. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. शिवाय प्रियाच्या काही क्यूट एक्सप्रेशन्सची चर्चा थांबता थांबत नाही आहे. तिच्या डोळ्यांच्या खूणा आणि त्यावर घायाळ होणारे अनेक जण सोशल मीडियावर गाण्याचं फारच कौतुक करतायेत. या गाण्याने बघता बघता ४५ लाखांच्यावर व्ह्युज मिळवले आहेत. योगायोग व्हॅलेंटाईन्स डे सुरु असल्यामुळे या व्हिडिओ तरुणांनी डोक्यावर घेतले आहे.

Priya Prakash Varrier Photos

१८ वर्षीय प्रिया केरळमधील त्रिशूर येथे राहते. ‘उरू अदार लव्ह’ या सिनेमातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्याने आतापर्यंत युट्यूबवर ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आभारही मानले आहेत.

पहा प्रिया वारियर चा नवीन व्हिडीओ