fbpx

प्रिया प्रकाश वारीयरचा राजकारणात प्रवेश?

priya politisc1

तिरुअनंतपुरमः आपल्या कलेने जगात लोकप्रिय झालेली प्रिया आता राजकारणातही झळकली आहे. प्रिया प्रकाशचा राजकारणात अप्रत्यक्षपणे प्रवेश झाला आहे. अस म्हणायला हरकत नाही. कारण केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांनी प्रियाच्या प्रतिमेचा वापर राजकीय प्रचारासाठी पोस्टर्समध्ये केला आहे.

एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्य व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. मात्र तिचे फोटो राजकीय पोस्टरवर पाहून प्रियाने राजकारणात प्रवेश केला का? म्हणून चर्चेला उधान आलं आहे.

poster

माकपची विद्यार्थी संघटना एआयएसएफच्या कोलकाता विभागाने केरळमध्ये होत असलेल्या परिषदेत काही पोस्टर्स लावली आहेत. या पोस्टर्सद्वारे तरुणाईला यात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. केरळच्या माकपने पोस्टर्समध्ये या अगोदर उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांचे छायाचित्र वापरले होते. या प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

1 Comment

Click here to post a comment