प्रिया प्रकाशने सांगितले कसा केला ‘तो’ डोळा मारण्याचा सीन, ज्याने लाखो घायाळ

Priya Prakash Varrier Photos

सध्या फेसबुक, ट्वीटर व्हॉटसअप सारख्या कोणत्याही सोशल मिडीयावर एकाच नावाची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरची. मागील दहा दिवसांपूर्वी कोणालाही माहित नसणाऱ्या प्रिया प्रकाशचे आज लाखो चाहते आहेत. तिच्या सोशल मिडीया अकौंउंटवर फोटो किवा एखादा व्हिडीओ पडताच लाखो views काही मिनिटांमध्येच मिळतात. प्रिया मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव’मध्ये नायिकेची भूमिका साकारत आहे.

आज सोशल मिडीयावर क्वचितच असा व्यक्ती सापडेल ज्याने प्रिया प्रकाशाच्या शाळेतील रोमांसचा व्हिडीओ पाहिला नसेल. काही सेकंदाचाच असलेल्या या व्हीडीओमुळेच सगळीकडे तीच नाव घेतल जात आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या आवडते बॉलीवूड स्टार्स कोण आहे हे सांगत ‘तो’ डोळा मारण्याचा सीन कसा केला हेही सांगितल.

Priya Prakash Varrier Photos

१८ वर्षीय असणारी प्रिया प्रकाश वारियर हि केरळच्या त्रिशूर शहराची राहणारी आहे. सध्या ती बी कॉमच शिक्षण घेतेय. रातोरात फेमस झाल्याच सर्व क्रेडीट ती सोशल मिडीयाला देते. विशेष म्हणजे ‘मस्ती करण्याची केवळ मुलांचीच मक्तेदारी नसून मी केलेल्या सीन मधून मुलीही डोळा मारू शकतात हे दाखवून दिल्याच प्रियाने सांगितल.

कसा दिला तो खास सीन
‘ओरू अदार लव’ या चित्रपटातील व्हायरल झालेल्या डोळा मारणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रिया प्रकाश शाळेतील विद्यार्थिनी असल्याच दिसत आहे. या बद्दल ती सांगते ‘जेव्हा हा सीन करायचा होता तेव्हा डायरेक्टरने केवळ एक सुंदर सीन करायला सांगितला. त्यासाठी कोणतीही रियसल करण्यात आली नव्हती. ऑन द स्पॉट हा सीन शूट करण्यात आला. मला केवळ डोळा मारायला सांगण्यात आल. पुढे जे झाल ते सगळ ऑन द स्पॉट तेही कोणताही रिटेक न घेता. त्यामुळे हा सीन एवढा फ्रेश दिसत असल्याच सांगायलाही प्रिया विसरली नाही.

कोण आहेत आवडते बॉलीवूड स्टार्स
मल्याळम सिनेमातून चित्रपट श्रुष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रिया प्रकाशचे आज सगळेच फॉलोअर्स झाले आहेत. मात्र तिला बॉलीवूड स्टार्स असणारे रणवीर सिंह और दीपिका पादुकोण आवडतात.

Priya Prakash Varrier Photos