देशभरातले डॉक्टर आज संपावर

medical student

मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी आज मंगळवारी देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी १२ तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचा हा निशेष आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपत्कालीन व्यवस्था सुरु राहणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केले आहे.

‘नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा गरीब रुग्णांच्या विरोधात आहे. तसेच वर्षभरापासून केंद्र सरकारबरोबर या विधेयकाबाबत चर्चाही सुरु आहे. मात्र, सरकारकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल. तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांवर कोणाचाही वचक राहणार नाही. या विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकार वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदांवर राजकीय किंवा अवैद्यकीय क्षेत्रातील लोकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आमचा या विधेयकाला विरोध आहे.’ असं आयएमएने स्पष्ट केलं.

या विधेयकाला मागील महिन्यातच केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. तेव्हापासूनच या विधेयकाला विरोध सुरु झाला होता. हे विधेयक ‘रुग्ण विरोधी’ असल्याचा दावा आयएमएनं (इंडियन मेडिकल असोसिएशन) केला आहे. कट प्रॅक्टिसला आळा बसावा यासाठी तज्ज्ञांनी मसुदा तयार केला आहे. या कायद्याला मंजुरी मिळाल्यास यासंबंधी कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरेल.गुन्हा सिद्ध झाल्यास पहिल्यांदा 1 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, तर दुसऱ्यादा 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते.