fbpx

खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची एमपीएससीच्या आंदोलनाला फूस- देवेंद्र फडणवीस

cm fadanvis

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची शंका व्यक्त केली.

स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत आज विद्यार्थांनी ‘आक्रोश मोर्चा’ काढला. यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एमपीएससी भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी सर्व्हे करणार असल्याचं स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या आंदोलनात तरुणांसोबतच खाजगी क्लासेसचे लोकही सहभागी होते, असा आरोप करताना मुंबईत झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची संशय फडणवीसांनी व्यक्त केला.