चिमुकल्याला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक

pune child beaten by teacher

पिंपळे गुरवमध्ये चार दिवसांपूर्वी अवघ्या तीन वर्ष्याच्या देव कश्यप या मुलाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने डोक्यात, हातावर आणि पाठीवर अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीमुळे चिमुकल्याचे डोळे देखील सुजले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला होता.

Loading...

अखेर काल खासगी क्लास शिक्षिका भाग्यश्री पिल्ले हिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आज पोलिसांनी तिला अटक केली आहे. दरम्यान या मुलाला केल्या गेलेल्या मारहाणीनंतर खासगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे,Loading…


Loading…

Loading...